पोस्ट्स

मार्च, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वनदुर्ग टिपागड - गडचिरोली

इमेज
    महाराष्ट्रातील किल्ले म्हटलं की सह्याद्री पर्वतरांगेवरील किल्ले डोळ्यासमोरून तरळून जातात. पण आपल्या विदर्भातदेखील किल्लेरूपी ऐतिहासिक वारसा अजूनही तग धरून आहे. पूर्व विदर्भाला वनांच्या स्वरूपात एक वरदानच लाभलेलं आहे. येथिल वनांना सरकारकडून सरंक्षण मिळाल्यामुळे जैवविविधताही  मुबलक प्रमाणात आहे. ताडोबा-अंधारी, नवेगाव बांध, पेंच ही प्रसिद्ध अभयारण्ये पूर्व विदर्भाची शोभा वाढवतात. तसेच अंबागड, माणिकगड, प्रतापगड यासारखे वनदुर्ग हौशी भटक्यांना आकर्षित करतात. ह्या किल्ल्यांच्याच पंगतीतला, तेवढाच तुल्यबळ किल्ला म्हणजे टिपागड.      टिपागड हा किल्ला गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात कोरची तालुक्यात, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याच्या सीमेजवळ असलेला महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील किल्ला आहे. ह्या किल्ल्याची डोंगररांग समुद्रसपाटीपासून अंदाजे २००० फूट असणाऱ्या मुरुमगाव जमीनदारी परिसरात आहे. ह्या किल्ल्याला भेट देण्यासाठी आपल्याला गडचिरोलीमधील कोरची या तालुक्याच्या गावामधून कोटगुळ गाठावे लागते. कोटगुळपासून सावरगाव रस्त्यावर साधारण दहा किलोमीटरवर उजवीकडे ट...